July 13, 2024
THANE | आपली पात्रता आणि योग्यता पाहून मुख्यमंत्र्यांशी बोलावे – नरेश मस्के
Amazon
महाराष्ट्र राजकीय

THANE | आपली पात्रता आणि योग्यता पाहून मुख्यमंत्र्यांशी बोलावे – नरेश मस्के

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शिवाजी मैदान या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन समाजसेवक राजा ठाकूर, विकास दाभाडे व उदय परमार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर नरेश मस्के माजी नगरसेवक सुधीर कोकाटे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग सहाय्यक आयुक्त महेश आहेर , उपस्थित होते.

यादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षावर घणाघाती टीका करत, संजय राऊत यांना ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल येथे दाखल करावे असाही टोला नरेश मस्के यांनी लगावला, तर आपली पात्रता आणि योग्यता पाहून मुख्यमंत्र्यांशी बोलावे व संजय राऊत यांच्याकरिता ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही बेड बुक करून ठेवला आहे असे त्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मधून लढावे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी दिल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी सटेलमेंट करावी लागली तसेच त्यांनी आपली उंची आणि वय यांचे भान ठेवलं पाहिजे असे सांगून ते का नाही वरळी चया बदली ज्या ठिकाणी राहतात तिथून लढले असा सवाल देखिल नरेश म्हस्के यांनी केला तसेच संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा तसेच पोट निवडणुकीत विजयी व्हावं अस आव्हान देखिल नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *