बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील सुपुत्र रवींद्र पांडुरंग राखुंडे हे भारतीय सैन्यात युनिट ९ गार्ड मध्ये लास नाईक पदावर आपले कर्तव्य बजावत असताना कमांड हॉस्पिटल पुणे या ठिकाणी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, त्यांच्यावर आज आपल्या मूळ गावी सोनेवाडी येथे लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी लष्करा सह पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्प चक्रवर्ती करून, त्यांना सलामी देत बंदुकीच्या फैरी झाडत अंत्यसंस्कार पार पडले.पांडुरंग राखुंडे हे सात वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते, त्यांच्या पश्चात पत्नी व एक वर्षाचा मुलगा आहे.