November 21, 2024
शिपाई आई – वडिलांची स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश
Amazon
महाराष्ट्र शैक्षणिक

शिपाई आई – वडिलांची स्नेहा पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश

सोलापूर : आई उज्वला जिल्हा आरोग्य विभागात शिपाई तर वडील सुनील हेही जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आहेत. तीन मुलांचा सांभाळ करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना नेहमीच काटकसर करावी लागायची.तरीपण, मुले नोकरीला लागली की परिस्थिती नक्की बदलेल, ही जिद्द उराशी बाळगून आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढला. ही जाण ठेवत मुलीने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. सोलापूरच्या शेळगीत राहणारी स्नेहा सुनील पुळुजकर ही नुकतीच न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

सोलापुरात मागच्या अनेक वर्षांपासून सुनील आणि उज्वला यांचा भाड्याच्या घरातच संसार चालू होता.त्यांना सुजित, सुजय आणि स्नेहा अशी तीन मुलं. आई-वडिलांनी स्वतःचं घर विकत घेण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्व दिलं. मुलांनीही आई-वडिलांच्या संस्कारावर वाटचाल करत उच्चशिक्षण घेतलं. आता मोठा मुलगा सुजित बंगलोर मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर लहान मुलगा सुयश सोलापुरात वकिली करत आहे. स्नेहा ही इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन ची पदवीधर इंजिनियर आहे. यामध्ये तिने विद्यापीठातून सुवर्ण पदकही मिळवला आहे. त्यानंतर पुन्हा स्नेहाने सोलापुरातील दयानंद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अंतिम वर्षात असताना तिने एमपीएससीची तयारी सुरू केली. दररोज 15 ते 18 तास अभ्यास करीत यश खेचून आणलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *