November 20, 2024
AMRAVATI | माझा घातपात नसुन अपघात होता – आ.बच्चू कडू
Amazon
महाराष्ट्र राजकीय

AMRAVATI | माझा घातपात नसुन अपघात होता – आ.बच्चू कडू

अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात नाही तर घातपात आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी केल्या गेली. यावर बच्चू कडू यांनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया अमरावतीत दिली.

माझ्या अपघातावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या. माझा अपघात झालेला आहे. घातपाताचा काही संबंध नाही. वाहन चालकाची चुकी नाही तर मीच गोंधळलेलो होतो. कोणत्याही गोष्टीवर राजकारण करावं परंतु त्याची शहानिशा करून राजकारण करावं अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *