October 18, 2024
पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे खुर्ची ग्रामपंचायत पातळीवर आणण्याचा प्रकार : प्रकाश आंबेडकर
Amazon
महाराष्ट्र राजकीय

पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे खुर्ची ग्रामपंचायत पातळीवर आणण्याचा प्रकार : प्रकाश आंबेडकर

 नाशिक :  नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे त्यांची खुर्ची ग्रामपंचायत पातळीवर आणण्याचा प्रकार असल्याची टीका  प्रकाश आंबेडकर यांनी  शनिवारी नाशिकमध्ये  केली.पंतप्रधान महापालिका स्तरावरील निवडणुकांच्या प्रचाराला येतात याबाबत विचारले असता पंतप्रधानांनी आपली गरिमा राखून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातच प्रचाराला यावे असे आपणास वाटते असे आंबेडकर म्हणाले.

घराणेशाही आणि धनदांडगेशाहीला मतदार कंटाळले असून त्यामुळे यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रतन कचरू बनसोडे यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे असे   वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

  बनसोडे यांच्या प्रचारासाठी नाशकात आले असताना  नासिक्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बनसोडे यांनी गेल्या सहा महिन्यापासून नाशिक विभागात मतदार नोंदणीचा व प्रचाराचा धडाका लावला आहे.हा मतदारसंघ मोठा असला तरी येथे मोठ्या प्रमाणात नकारात्मकता दिसते.जो उमेदवार निवडून येईल तो कमिटेड मतांच्या जोरावरच असे सांगून आम्ही या मतदारसंघात शर्यतीत आहोत. लोक धनशक्ती आणि घराणेशाहीला यावेळी नाकारतील. आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. तालुकास्तरापर्यंत कार्यकर्ते पोहोचले आहेत. बनसोडे यांचा जोमाने प्रचार सुरू झाला आहे.कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्हाला या मतदारसंघात बनसोडे यांच्याबाबत चांगले चित्र बघायला मिळत आहे,असेही आंबेडकर म्हणाले.

  नाशिक  मतदारसंघात शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत प्रश्न विचारला असता शिवसेनेशी आमचे अजून जमलेले नाही.फक्त एकमेकांवर लाईन मारणे सुरू आहे असे आंबेडकर म्हणाले. 

    शासकीय कार्यक्रमांना विरोधी पक्षांच्या लोकांना डावलले जाते याबाबत   पूर्वी शासकीय कार्यक्रम होत त्यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावेही पत्रिकेत असायची.त्यामुळे आता जो पायंडा पाडण्यात येत आहे. ही हुकूमशाही आहे का हे लोकांनीच ठरवायचे आहे. असा टोलाही त्यांनी  भाजपला लगावला. एकीकडे तुमची शिवसेनेबरोबर युतीची चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटता. यामागचे रहस्य काय असा सवाल केल  असता इंदु मीलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक साकारत आहे. त्यात त्यांचा जो भव्य पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणताही आक्षेप राहू नये यासाठी मदत करा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी आपणास केल्याने जेव्हा जेव्हा त्याबाबत आपणास बोलावले जाईल तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटत राहीन असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धिकुत उमेदवार रतन बनसोडे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन दादा गायकवाड, जिल्हा अधस्क्ष्य पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, चेतन गांगुर्डे, महिला जिल्हा आध्यश उर्मिला गायकवाड आदी पदधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *