ANC – डोंबिवलीत एका कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी डबल इंजिनचा नाही ट्रिपल इंजिनचा सरकार आलं पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका परिसरात शिंदे फडणवीस सरकार यांच्या विचाराची लोक जिंकून येतील असा विश्वास दाखवला , मात्र डबल इंजिनचा नाही ट्रिपल इंजिनचा सरकार आलं पाहिजे या वक्तव्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला तिसरा इंजिन कोणाचा लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिका निवडणुकीत शिंदे भाजप युतीनंतर तिसरा इंजिन मनसेचे असेल का ? असा प्रश्न आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावर मनसे आमदार राजू पाटील यांनी बोलताना ते मगाशी बोलने मी ही ऐकलं, केडीएमसी मध्ये ट्रिपल इंजिनियर मी आपणास सांगू इच्छितो की इंजिन ही आमची निशाणी आहे आणि त्याचे संकेत युतीकडे असतील तर तो सर्वस्व आमच्या राज साहेबांचा विषय आहे. आम्ही सर्व निवडणुकी एकला चलो रे लढत आलेलो आहे. केडीएमसी मध्ये आमची ताकद आहे. आमचे 27 नगरसेवक 2010 ला होते. विरोधी पक्ष नेते आम्ही 2015 ला टिकवलं त्यामुळे आताही आमचा सत्तेत जाण्याचा प्रयत्न असणार असे मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.