September 8, 2024
मोस्ट वॉन्टेड चार्ल्स शोभराज 19 वर्षांनी तुरुंगाबाहेर
Amazon
आंतरराष्ट्रीय क्राईम

मोस्ट वॉन्टेड चार्ल्स शोभराज 19 वर्षांनी तुरुंगाबाहेर

Charles Shobhraj
(छायाचित्र -बिकीनी किलर मोस्ट वॉन्टेड चार्ल्स शोभराज 19 वर्षांनी तुरुंगाबाहेर)

लोक जागर ऑनलाईन : कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराज याची आज (ता.२३) नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये गेल्या 19 वर्षांपासून तो शिक्षा भोगत होता. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं वृद्धत्व लक्षात घेऊन त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यासोबतच त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येप्रकरणी शोभराजला 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

चार्ल्स शोभराजची पत्नी निहिता बिस्वास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आज संध्याकाळीच चार्ल्सला फ्रान्समध्ये त्याच्या कुटुंबाकडे पाठवण्याचा प्रयत्न करतेय. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे चार्ल्सची आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चार्ल्स शोभराज खून, चोरी आणि फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहे आणि भारत, ग्रीससह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याचा हात आहे. मात्र, नेपाळ भेटीदरम्यान दोन परदेशी पर्यटकांच्या हत्येप्रकरणी चार्ल्सला 2003 मध्ये अटक करण्यात आली. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नेपाळमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेच्या अंतर्गत 20 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *