मुंबई, :- महागाई, बेरोजगारी, पळविलेले उद्योगधंदे, महापुरुषांचा होत असलेला अवमान असे विविध प्रश्न हाती घेत महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चात भुजळांनी तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात छगन भुजबळ यांनी अग्रभागी सहभागी होत सरकार विरोधात हल्लाबोल केला.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण, शेकाप नेते भाई जयंत पाटील,आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे,भाई जगताप,खा.सुप्रिया सुळे, खा.संजय राऊत, दिलीप वळसे पाटील,समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास नागपाडा येथे मोर्चा स्थळी नियोजनाची पाहणी करत सहभागी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मोर्चा सुरू होताच मोर्चात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, राज्यात रोजगार देणारे उद्योग पळविले जात आहे. सीमा प्रश्नावर नको ते प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगितला जात आहे. राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.
या मोर्चाच्या अग्रभागी महापुरुषांचे चित्ररथ ठेवण्यात आले होते. या चित्ररथांचे सर्व नियोजन माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केले.या चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधले.यावेळी मोर्चेकऱ्यानी महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल करत महापुरुषांच्या नावाच्या घोषणा दिल्या.
महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले नाशिकचे पदाधिकारी व कार्यकर्ते
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर व जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते महामोर्चात सहभागी झाले. सकाळी ६ वाजेच्या सुमारास सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाशिक येथील राष्ट्रवादी भवन कार्यालय येथे एकत्र येऊन मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे,प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे,नानासाहेब महाले, रविंद्र पगार, कोंडाजिमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधूने, बाळासाहेब कर्डक,महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कविता कर्डक,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजूरकर, संजय खैरनार यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.