सांगलीच्या शिराळामध्ये प्रहार संघटनेच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस प्रहार संघटना यांच्या वतीने निषेध व्यक्त करून चप्पल मारो आंदोलन..
शिराळा येथील पोटे चौकात प्रहार संघटना सांगली वाळवा शिराळा यांच्या वतीने निषेध व्यक्त करून रवी राणा यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस चप्पल मारो आंदोलन करण्यात आले.
आज प्रहार संघटना सांगली जिल्हा ,प्रहार शेतकरी संघटना सां गली , शिराळा वाळवा प्रहार संघटना , वतीने नामदार बच्चुभाऊ कडू यांच्यावर गरळ करणाऱ्या आमदार रवी राणा याला यांच्या प्रतिमेस 32 शिराळा येथील पोटे चौकात चपलांचा हार घालून व जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील प्रहार संघटना, शिराळा तालुका अध्यक्ष बंटी नांगरे पाटील , प्रहार शेतकरी संघटनेचे रायसिंग , शिवाजी सिंग , शहराध्यक्ष शिराळा प्रहार , अजिंक्य कोळी, अपंग क्रांती आंदोलनाचे तुकाराम पवार, सुनील मिरजकर, व असंख्य प्रहार सैनिक उपस्थित होते….