अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. तसेच खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली.
(दि.२८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला.
यावेळी त्याचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला. त्याचवेळी या ठिकाणाहून अक्षय समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला. तर गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्या