September 16, 2024
चोपडा धरणगाव रस्त्यावर कंटेनर मोटरसायकल अपघातात मामा भाचीचा मृत्यू
Amazon
क्राईम महाराष्ट्र

चोपडा धरणगाव रस्त्यावर कंटेनर मोटरसायकल अपघातात मामा भाचीचा मृत्यू

चोपडा धरणगाव रस्त्यावरील रेल मारुती मंदिरा जवळ वळणावर धरणगाव कडून चोपडा कडे येणाऱ्या कंटेनर तर चोपडा कडून धरणगावकडे जाणाऱ्या मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाल्याने यात मामा भाचीच्या मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले असून त्यांचावर चोपडा येथे उपचार सुरू आहे .

चोपडा धरणगाव रस्त्यावरील रेल मारुती जवळ वळणावर धरणगाव कडून येणाऱ्या हरियाणा पासिंगच्या कंटेनर ने चोपड्याकडून धरणगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याने त्यात समाधान रामचंद्र सपकाळे वय 40 राहणार दहिदुला तालुका धरणगाव व विधी विनोद कोळी वय पाच वर्ष राहणार विरवाडा तालुका चोपडा यांचा मृत्यू झाला आहे तर चंद्रकला विनोद कोळी वय 35 , ललित विनोद कोळी वय दोन वर्ष दोघं राहणारे विरवाडे हे जखमी झाले त्यांच्यावर चोपडा येथे उपचार सुरू आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनला कंटेनर चालक यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून कंटेनर चालक याला अटक करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *