शिंदे-फडणवीस सरकारमधील आ. बच्चू कडू आणि आ.रवी राणा या दोन आमदारांमध्ये सद्या वाक युद्ध सुरु आहे. त्यांच्यावर भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपली प्रतिक्रीया दिली असून दोघांनीही बोलतांना महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती जपावी, असा सल्ला आमदार भारतीय यांनी दिला आहे.
दोन्ही नेते जनतेतून निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता ही राजकीय संस्कृती समजणारी जनता आहे.त्यामुळे दोन्ही नेत्यांनी समजदारीने वागले पाहीजे, अशी त्यांना ज्यांनी ज्यांनी निवडून दिले त्यांची अपेक्षा आहे. मुळात अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असूच शकत नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रातला नेता कुणाही असू द्या, मग ते बच्चू कडू असो अथवा रवी राणा असो, आपण बोलतांना आपल्याला ज्यांनी निवडून दिले ते आपल्या महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता आहे, त्यांच्या अपेक्षीत शब्दांचाच वापर आपण केला पाहिजे, असेही आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले