September 8, 2024
सूर्यग्रहणाकडे भौगोलिक घटना म्हणून पहा…अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
Amazon
अध्यात्मिक महाराष्ट्र

सूर्यग्रहणाकडे भौगोलिक घटना म्हणून पहा…अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

सूर्यग्रहणामुळे खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर बंद.

आज संपूर्ण देशभरात आणि जगभरात खंडग्रास सूर्यग्रहण पार पडणार आहे मात्र या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर समाजात विविध श्रद्धा अंधश्रद्धा जोपासले जातात, या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सूर्यग्रहण ही भौगोलिक घटना म्हणून त्याकडे पाहावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.

आज होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतेही अंधश्रद्धेला बळी न पडता ही भौगोलिक घटना म्हणून सूर्यग्रहणाकडे बघावे तसेच याबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा समाजात असून यावर विश्वास न ठेवता आपले दैनंदिन काम करावे, सूर्यग्रहण ही भौगोलिक घटना असून सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये होणाऱ्या भौगोलिक घटनेतून सूर्यग्रहण होत असते, मात्र सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न बघता त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध वस्तूंचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.

सूर्यग्रहणाच्या काळात जेवण करू नये झोपू नये तसेच गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये फळे आणि भाज्या चिरून असे समज गैरसमज पसरविले जातात मात्र आपले दैनंदिन कामे केल्याने किंवा गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहिल्याने त्यांच्यावर कुठलीही दुष्परिणाम होत नाहीत सूर्यग्रहण ही भौगोलिक घटना असून विज्ञानवादी दृष्टिकोनातून या घटनेकडे पहावे असे आवाहन अविनाश पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *