नाशिक
नाशिक तालुक्यातील लहवित गावातील इंडियन आर्मी मधील सैनिक संतोष विश्वनाथ गायकवाड हे आसाम / सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद झाले आहेत.
संतोष गायकवाड यांची लष्करात सोळा वर्षे सेवा झालेली होती. ते दहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते, पंरतु त्याअगोदरच त्यांना वीरमरण आले. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, एक मुलगा आई-वडील, भाऊ असा परिवार आहे