मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक प्रकाश सुकदेव कोल्हे यांच्या संकल्पनेतून व संस्थासचिव ज्योती प्रकाश कोल्हे यांच्या नियोजनातून गेली १२ वर्षे सातत्याने पाड्यावर प्रतिवर्षी दुर्गम, आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येते. आपल्यातील थोडे देऊन त्यांच्या आनंदात आनंद शोधण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक प्रयत्न! यासाठी या अभिनव उपक्रमात विविध सामाजिक स्तरातून लोकांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक श्री प्रकाश सुकदेव कोल्हे यांनी केले आहे.'मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा' या ध्येयाला गवसणी घालणाकरीता मानवधन संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याच्या संकल्पपूर्तीस १३ वर्ष पूर्ण होत आहेत.
पाड्यावरील बांधवांसाठी या अभिनव उपक्रमाद्वारे स्नेहबंध दृढ करण्याचा मानस लोक सहभागातून आणि सहकार्याने निश्चितच पूर्ण होईल. त्यासाठी लोकांचे अमूल्य सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी मदतीचा हात पुढे करावा. नवीन कपडे, दिवाळी फराळ, कोरडा खाऊ व स्वेटर, पणत्या जीवनावश्यक वापरात येणाऱ्या वस्तू इ. आदिवासी, गरजू बांधवांकरीता देऊ शकता. या सेवा कार्यात सहभागी होऊन या महान सेवापूर्तीच्या कार्यातून माणूस म्हणून सेवेचा आनंद घ्यावा. असे आवाहन प्रकाश कोल्हे यांनी केले आहे.
त्यासाठी १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपण वरील साहित्य जमा करू शकता.
संपर्क मोबाईल नंबर :
विट्ठल जाधव :- 9657301011
जगदीश हुल्लूळे 7588174871