ब्रेकिंग
अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

 

​अमळनेर (प्रतिनिधी):येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक श्री. पवन नामदेव पाटील यांना अ‍स्पायर फाउंडेशन आयोजित ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले आहे. नाशिक येथील संजीवनी ए. सी. बँक्वेट हॉल अँड लॉन्स (नांदूर नाका) येथे आज, रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान सोहळा उत्साहात पडला.

 ​उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल

​अ‍स्पायर फाउंडेशनतर्फे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेल्या नामनिर्देशन प्रस्तावांची छाननी करून, पवन पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

 ​पुरस्काराचे स्वरूप

​या सोहळ्यात त्यांना शाल, फेटा, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी आणि आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 ​पवन पाटील यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पवन पाटील यांचे जळगाव जिल्हा खाजगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था चे संचालक स्वप्नील पाटील,आशिष पवार आणि महेंद्र रामोशे आणि साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तसेच अमळनेर परिसरातील शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *