शालेय शासकीय तालुका हॉलीबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न….
अमळनेर ( प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालयन महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जळगाव जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव व एरंडोल विभागाचे क्रीडा सचिव प्राध्यापक डॉ. देवदत्त पाटील सर , प्रमुख पाहुणे म्हणून धनदाई एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी सौ प्रमिला दत्तात्रेय पाटील, प्रा. डॉ.नयना कैलास पाटील डि आर कन्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॅडम, प्रा. सौ निशा शैलेंद्र पाटील ,धनदाई कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रा. जयवंत पाटील सर, अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष श्री एस पी वाघ सर ,कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. शैलेंद्र पाटील यांनी मेजर ध्यानचंद व बजरंग बली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रीफळ फोडून व मैदान व चेंडूची पूजा करून उद्घाटन केले.
या स्पर्धेसाठी अमळनेर तालुक्यातील 14 ,17,व 19 वर्षाआतील 20 संघ मुले व 12 संघ मुली अश्या 250 खेळाडूंनी सहभाग घेतला .
प्रमुख पाहुणे सौ प्रमिला पाटील मॅडम यांनी भाषणात मुलांनी मेहनत करा असे सांगितले,
प्रा. डॉ. नयना पाटील मॅडम यांनी सांगितले की खेळाडू हा शिस्तप्रिय व मेहनती असतो. मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की खेळाडूंना आता चांगले दिवस आलेले आहेत व विविध क्षेत्रात आता नोकरीची संधी आहे.
उद्घाटक उद्घाटक प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी बोलताना सांगितले की, शालेय स्पर्धेतून आपल्याला चांगली संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचे सोने करून कष्ट व मेहनत करून आपण देशाचा मान सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. अत्यंत रोमर्षक , अटितुटीचे सामने या वेळेस प्रेक्षकांना बघायला मिळाले.
मुलांच्या 14 वर्षांच्या आतील गटात.. विजयी.. ग्लोबल स्कुल ,उपविजयी.. स्वामी विवेकानंद स्कुल,
विजयी..शारदा माध्य.कळमसरे
उपविजयी.. स्वामी
17वर्षाआतील.. विजयी.साने गुरुजी ,उपविजयी.. ललिता पाटील स्कुल ,
विजयी.. शारदा विद्या.कळमसरे
उपविजयी.. स्वामी विवेकानंद
19वर्षाआतील
विजयी .. प्रताप कॉलेज
उपविजय.. जय योगेश्वर विद्यालय
आलेल्या मान्यवरांचा व आलेल्या क्रीडा शिक्षकांचे स्वागत व सत्कार प्रा.प्रितेश तुरणकर व श्री स्वप्निल पाटील यांनी बुके व शाल देऊन केले.
या स्पर्धेच्या वेळी श्री आरे ए घुगे सर , श्रीमती आर एस सोनवणे मॅडम,श्री विनायक सूर्यवंशी, श्री जे व्ही बाविस्कर , श्री जयेश मासरे, श्री सागर चावरीया, श्री एस वाय करंदीकर, श्री मयूर बारस्कर, श्री के आर बाविस्कर,श्री महेंद्र पारधी, श्री आर ए पवार ,श्री हेमंत जाधव, श्री योगेश पाटील, श्री कृष्णा तुरे सर, श्री राजेंद्र देशमुख सर, श्री आदित्य राज पाटील, श्री राजेश राठोड,श्री केदार देशमुख, श्री ज्ञानेश्वर महाजन, श्री मुनाफ तडवी इ. शिक्षकांनी पंचांचे काम पाहिले व स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
