शिस्त, संयम आणि नियोजनाचा आदर्श; गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे अभिनंदन
अमळनेर : गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत, शिस्तबद्ध आणि अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ मा. अशोक नखाते, पोलीस अधीक्षक मा. विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेने विशेष परिश्रम घेतले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी दाखविलेली कर्तव्यतत्परता, संयम आणि उत्तम नियोजन यामुळे मिरवणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष मैदानावर बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली.
गणेशोत्सव हा अमळनेरच्या सामाजिक सलोखा आणि उत्सवी परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव, नागरिक आणि प्रशासन यांनीही सहकार्य केले.
गणेश विसर्जन मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पाडल्याबद्दल संपूर्ण पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सलाम! 🙏🏻
