महात्मा फुले हायस्कूल मध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा शाक्त शिवराज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २४ सप्टेंबर ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवरायांचा दुसरा “शाक्त राज्याभिषेक दिन ” व महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या “सत्यशोधक समाज स्थापना दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्ही टी माळी यांनी शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन याविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.या दिनानिमित्त शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.
निबंध स्पर्धा ( मोठा गट विजयी )
१. कु.जया मनोज सोनवणे – १० वी
२. कु.श्वेता संजय भोई – १० वी
३. कु. भावना उरमल बारेला – ९ वी
निबंध स्पर्धा ( लहान गट विजयी )
१. करण मनोज सोनवणे – ७ वी
२. कु.रितू तुळशीराम जाधव – ६ वी
३. रोहन सुनील भिल – ५ वी
चित्रकला स्पर्धा ( मोठा गट विजयी )
१. कु. मयुरी राजेंद्र भोई – १० वी
२. रोहन रवी करोसिया – ८ वी
३. हर्षाली रवी करोसिया – ९ वी
चित्रकला स्पर्धा ( लहान गट विजयी )
१. संदीप बापू सोनवणे – ७ वी
२. गुंजन संजय घिसाडी – ६ वी
३. कविता मंसाराम बारेला – ५ वी
