जि. प. शाळा दहिवद बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अमळनेर दहिवद येथील ज्या काळात अज्ञानाचा अंधार होता आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात क्रांतीची मशाल घेऊन जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहिवद येथे अत्यंत उत्साह पूर्वक वातावरणात साजरी झाली. गावातील माजी सरपंच श्री देवानंद बहारे यांनी गरीब होत करू गावातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना दप्तर वही पेन यांचे वाटप केले तसेच तसेच माजीअध्यक्ष श्री अनिल महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस दिले शाळेतील गतकाळातील युवा प्रशिक्षणार्थी श्री भागवत सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली

” *बाबासाहेब केवळ एक नाव नसून तो एक विचार आहे* ,” या भावनेने शाळेतील चिमुकल्यांनी या महामानवाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नतमस्तक झाले. ” तुम्ही आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, म्हणूनच आज आम्ही शाळेची पायरी चढू शकलो* ,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी संविधानाच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रम चे सूत्रसंचालन संजय शिंदे तर आभार दिपक सोनवणे यांनी केले.

  याप्रसंगी मुख्याध्यापक हरीश पाटील, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याने प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेची भावना जागृत केली. डॉ. बाबासाहेबांच्या ‘ *शिका आणि संघटित व्हा* ‘ या मंत्राचा जागर करत हा छोटेखानी पण प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *