ब्रेकिंग
हॉटेल चिन्मय ला लागली आग, शेतातील चारा जळून खाक 

 

अमळनेर ( प्रतिनिधी) शहराबाहेरील धार मारवड रस्तावरील चिन्मय हॉटेलच्या मागील शेतात आग लागल्याने शेतातला काढलेला गहू, मका जळून खाक झाला आहे. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने चिन्मय हॉटेलला देखील आग लागली. तेथील मोठ्या झाडांना ही आग लागली. हॉटेलची आग विझविण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले मात्र वारा सुरू असल्याने शेतातील गहू चाऱ्याची आग जोरात पसरत होती. माजी नगरसेवक किरण बागुल, जालिंदर चौधरी हॉटेलचे मालक श्याम बागुल यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांनी तात्काळ तिन्ही अग्निशमन बंब रवाना केले. कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जाफर पठाण, वासिम पठाण, आनंदा झिंबल, सत्यम संधनशिव, मच्छिंद्र चौधरी, भिका संधनशिव, आकाश बाविस्कर, आकाश संधनशिव, अजय बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न करून केशवनगर पर्यंत गेलेली आग नियंत्रणात आणली.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens