ब्रेकिंग
शुभारंभ! जनतेचा आवाज आता आणखी बुलंद!

“आवाज जनतेचा, जागर सत्याचा” — लोकजागर न्यूजसोबत नव्या पर्वाची सुरुवात!

प्रिय वाचकहो, सस्नेह नमस्कार

गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. 2001 साली पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथे पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर अमळनेर येथे विविध दैनिकांमध्ये काम केले तसेच दोन वर्षे स्वतःचे साप्ताहिक यशस्वीपणे चालविले.

काही वैयक्तिक कारणांमुळे पत्रकारितेतून थोडा काळ विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा नव्या उर्जेने, नव्या जोमाने लेखणी हातात घेत आहे.

“लोकजागर न्यूज” या वेब पोर्टलच्या माध्यमातून मी पुन्हा आपल्यासमोर येत आहे.
जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सत्याला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून (14 एप्रिल 2026)
“लोकजागर न्यूज” या ऑनलाईन वेब पोर्टलचा शुभारंभ करत आहोत.

काही वर्षांच्या खंडानंतरही, तीच जिद्द, तोच उत्साह आणि काहीतरी वेगळं करण्याची तीच धडपड!
सामाजिक बांधिलकी जपत, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी पत्रकारिता आम्ही सातत्याने करत राहू.

“लोकजागर” च्या माध्यमातून तुमचा आवाज देशभर पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.

धन्यवाद!
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत…

हृदयनाथ मोरे
मुख्य संपादक
लोकजागर न्यूज

One thought on “शुभारंभ! जनतेचा आवाज आता आणखी बुलंद!

  1. आदरणीय हृदयनाथ मोरे आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens