शहीद दिनाचे औचित्य: चुंबळे,गायधनी यांनी प्रश्नोत्तरेद्वारे साधला संवाद
नाशिक- भोसला मिलीटरी कॉलेजमधील कला,संगणक,जर्नालिझम विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज शहिद दिनाचे औचित्य साधत भारतीय स्वातंत्र्य लढयात गाजलेल्या विजयानंद चित्रपटगृहास भेट दिली. वय वर्षे १९ असलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी कृष्णाजी कर्वे आणि गोपाळ देशपांडे यांच्या साथीने विजयानंद नाट्यगृहात नाटक सुरु असतांनाच अधिकाऱ्यांच्या गराड्यात असलेल्या कलेक्टकर जॅक्सनच्या समोर उभे राहुन त्यांच्या छातीत गोळ्या झाडून जॅक्सनचा वध केला.
आजच्या भेटीवेळी विजयानंद,दामोधर चित्रपटगृहाचे संचालक विनय चुंबळे,नाट्यलेखक सुरेश गायधनी, चित्रकार रूचिर पंचाक्षरी हे उपस्थित होते. श्री. गायधनी यांनी तत्कालीन या संपूर्ण घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी आणि सहकाऱ्याची शौर्य,धाडसाची ही कृती सर्व भारतीयांसाठी अभिमानाची त्याचप्रमाणे प्रेरणादायी ठरली आहे. आम्ही याच घटनेवर आधारीत नाटकाची निर्मिती केली. त्यात हुतात्मा कान्हेरे यांचा संपूर्ण जीवनप्रवास मांडला असल्याचे सांगितले.
श्री. चुंबळे यांनी आपल्या घराण्याच्या मंडप व्यवसायाची माहिती देत त्यातून प्रेरणा मिळत गेली आणि पुढे याच मंडळात नाटकाचे सादरीकरण केले जात होते, हे सांगितले, कलेक्टर जॅक्सन नाटक पाहण्यासाठी आले तेव्हाही तशापध्दतीची रचना होती. तेव्हानी नाटकघर प्रेक्षकांनी तुडूंब भरलेले तसेच ब्रिटीश अधिकारी कर्मचारी याचा राबता,बंदोब्स्त असतांना हुतात्मा अनंत कान्हेरे याची हे धाडस दाखवले. ही नाशिककरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे यावेळी ही संपूर्ण घटना चित्राद्वारे मांडणारे चित्रकार रुचिर पंचाक्षरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न श्री.चुंबळे,गायधनी यांना विचारत आपल्या शंकाचे निरसन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट देत या ऐतिहासिक विषयांची पार्श्वभूमी,इतिहास जाणून घेण्याची संधी मिळाली. इतिहास विभाग प्रमुख बी.जे.पांडवे यांनी प्रास्ताविक केले. संरक्षण विभाग प्रमुख डॉ.रमेश राऊत यांनी आभार मानले.
महाराष्ट्र
भोसला कॉलेज`च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली हुतात्मा अनंत कान्हेरेची शौर्यगाथा
- by Team Lokjagar
- March 24, 2023
- 0 Comments
- 144 Views