BEED – बीडमध्ये विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज रस्त्यावर उतरला आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी विश्वकर्मा समाजाचे संत भोजलिंग काका यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. आणि याचीच ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमावर वायरल होत आहे. पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने विश्वकर्मा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर विश्वकर्मा समाजाने मोर्चा काढला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत विठ्ठल पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
अध्यात्मिक
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
BEED | वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज रस्त्यावर
- by Team Lokjagar
- February 11, 2023
- 0 Comments
- 104 Views