KALYAN – डोंबिवली पश्चिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डोंबिवली विधानसभा संघटक प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, रोहित म्हात्रे, किरण मोंडकर, शाम चौगुले आदी शिवसैनिक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच आमदार आदित्य ठाकरें यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत जेव्हा पत्रकारांनी मंत्री तानाजी सावंत यांना सवाल विचारला तेव्हा त्यांनी ‘आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू’, असं म्हणत तानाजी सावंत यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेधार्थ आज डोंबिवलीत जोडे मारो आंदोलन करण्यात आला.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राजकीय
KALYAN | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
- by Team Lokjagar
- February 11, 2023
- 0 Comments
- 109 Views