September 15, 2024
बच्चू कडू यांच्या दाव्याने पुन्हा राजकीय भूकंप
ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बच्चू कडू यांच्या दाव्याने पुन्हा राजकीय भूकंप

मुंबई-येत्या १५ दिवसांत २० ते २५ आमदारांचा शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो, असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शिंदे गट आणि भाजपाकडून व्यक्त केला जातो. असे असतानाच कडू यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे या आमदारांचा पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, असेही बच्चू कडू यानीं आपल्या विधानात म्हंटले आहे.

त्यांनी असे देखील म्हंटले कि, सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा कोर्टाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच लांबतो आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version