November 21, 2024
प्लेटलेट्स च्या नावाखाली मोसंबी जुस , दहा अटकेत
क्राईम

प्लेटलेट्स च्या नावाखाली मोसंबी जुस , दहा अटकेत

उत्तर प्रदेश : सध्या मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील अनेक महानगरांमध्ये लेप्टो, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा फैलाव वाढला आहे. या रोगांचा सामना करताना मोठ्या प्रमाणावर रक्ताची आणि प्लेटलेटची गरज भासत आहे. मात्र ज्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहे, त्या प्रमाणात रक्त आणि प्लेटलेट्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे रक्ताचा आणि प्लेटलेटचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये प्लेटलेट्स म्हणून मोसंबीचा ज्यूस दिला जात होता, अशी माहिती एका रॅकेटच्या अटकेतून उघडकीस आली आहे.

प्लेटलेटच्या गोरख धंद्याने एका रुग्णाचा हकनाक बळी घेतला आहे. एका डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्स म्हणून मोसंबी ज्यूस चढवण्यात आला होता. त्याचा दुष्परिणाम होऊन रुग्णाला काही वेळातच प्राण गमवावा लागला.

प्रदीप कुमार पांडे असे रुग्णाचे नाव असून त्याला डेंग्यूवरील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या मृत्यूने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित खाजगी रुग्णालयाला सील ठोकण्यात आले आहे.

प्लेटलेटचा गोरख धंदा सुरू असल्याच्या वृत्ताने आरोग्य प्रशासन प्रचंड हादरले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आरोपी प्लेटलेटचा बनावट स्टिकर लावून प्लेटलेट्स म्हणून विक्री करताना आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version