November 21, 2024
राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
शैक्षणिक

राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

समाज कल्याण विभागाकडून ७ कोटी रुपयांचा निधी वितरित,

नाशिक विभागासाठी 1 कोटी 5 लाख

नाशिक :

राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, समाज कल्याण विभागाने नुकतेच त्या संदर्भात तरतूद वितरित केली असून राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांना सुमारे 7 कोटी 55 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे.राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशान्वये राज्यातील विभागीय कार्यालयांना सदर निधी वितरित करण्यात आला आहे, एक प्रकारे समाज कल्याण विभागाने दिवाळी भेट दिली असून राज्यातील सर्वच समाजकार्य महाविद्यालयांची कर्मचारी यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.

त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी समाज कल्याण विभागाचे आभार व्यक्त केले आहे. सदर निधी विभागीय कार्यालयातून जिल्हा कार्यालय व संबंधित महाविद्यालयांच्या कर्मचारी यांना लवकरच मिळणार आहे. वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये मुंबई विभाग 15 लाख , पुणे विभाग 1 कोटी 5 लक्ष ,औरंगाबाद विभाग 30 लक्ष, लातूर विभाग 30 लक्ष , नागपुर विभाग 3 कोटी 2 लाख, नाशिक विभाग 1 कोटी 5 लाख व अमरावती विभाग 1 कोटी 67 लाख याप्रमाणे एकूण राज्यासाठी 7 कोटी 55 लाख 22 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. नागपूर विभागात सर्वाधिक समाजकार्य महाविद्यालय असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना चा लाभ होणार6 आहे.

यासंदर्भात राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालय यांनी शासनाकडे यासंदर्भात मागणी केली होती, त्यानुसार समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा केला असल्याने त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे. त्यानुसार राज्याच्या वित्त विभागाने नुकताच संगणक प्रणालीवर सदर निधी उपलब्ध करून दिला असल्याने आयुक्त यांनी तातडीने या संदर्भात आदेश निर्गमित करून निधी वितरित केला आहे.

*”राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी यांनी यासंदर्भात केलेल्या मागणीची दखल घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता, त्या मागणीला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरात या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येणार आहे. यापुढील काळात देखील समाजकार्य महाविद्यालयाचे इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा विभागाचा प्रयत्न आहे”*

डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version