त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष पंचायती ,आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज
(वय १०१) वृद्धापकाळाने ब्रह्मलीन झाले. स्वामीजी ब्रह्मलीन होण्याने त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यातील सूर्य मावळला आहे. स्वामीजी काही महिन्यांपासून वृद्धपकालने आजारी होते. नाशिक मध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय उपचारही केले. परंतू त्यात यश आले नाही.
त्र्यंबकेश्वरच्या सहा कुंभमेळ्यासह ईलाहाबाद , प्रयाग , हरिद्वार अशा १९ कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ श्रेष्ठ ,ज्ञानवृद्ध ,तपस्वी जूने जाणते महंत अशी ख्याती आहे.
२०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. पण येत्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ की नाही हे देवाच्या हातात असते, असेही त्यांनी सांगितले होते. यावर्षी गुरुपौर्णिमा उत्सव त्यांच्या उपस्थित शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाला होता. अलीकडेच गजलक्ष्मी माता मंदिरात दर्शनाला आले असताना त्यांचे दर्शन भाविकांना झाले. महंत शंकरानंद सरस्वती उर्फ भगवान बाबा हे ५० वर्षापासुन त्यांच्यासोबत आहे . महंत शंकरानंद सरस्वती हे अखिल भारतीय आखाडा परिषदेवर सचिव आहेत. महंत गणेशानंद सरस्वती, स्वामी गिरिजानंद सरस्वती, स्वामी सर्वनंद सरस्वती, महंत केशवानंद सरस्वती , महात रामानंद सरस्वती हे साधू गण त्यांच्या सेवेत असतात.
अत्यंत मनमिळावू शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते. प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात समन्वय साधला. आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लाखो रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार केले. त्यांचे देशभरात हजारो शिष्य आहेत. प्रापंचिक साधकांनी त्यांची गुरुदिक्षा घेतली आहे. गुरुपौर्णिमा, इतर उत्सवात त्यांच्या गणपतबारी आश्रमात यात्रेचे स्वरूप येत असायचे. संत, महंत, भाविकांच्या साक्षीने शनिवारी (दि.८) दुपारी चार वाजता आनंद आखडा गजलक्ष्मी मंदिर येथे समाधी देणार आहे.