क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नावाने ओटीपी मागवून अज्ञात व्यक्तीने पळासदळे येथील एकाचे खात्यातून ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना ३ रोजी घडली.
संजय बाबुराव पाटील रा पळासदळे या शेतकऱ्याला २ रोजी एकाने फोन करून स्टेट बँकेचा अधिकारी सांगून क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे म्हणून फोन करून १६ अंकी डिजिट नंबर आणि तीन अंकी सिव्हीसी मागितला. शेतकऱ्याने रस्त्यावर असून नंतर सांगतो म्हणून तेव्हा नकार दिला. मात्र पुन्हा त्याच्या नंबर वर फोन आला. व कार्ड बंद न केल्यास ४५०० रुपये दंड लागेल म्हणून शेतकऱ्याला सांगितले.सकाळी त्याने विश्वासात घेऊन १६ अंकी नंबर मिळवला. नंतर ओटीपी ही मागवून घेतल्याने शेतकरी संजय बाबुराव पाटील यांच्या खात्यावरील ६७ हजार रुपये काढून घेतल्याचा संदेश प्राप्त झाला. संजय पाटीलने अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अध्यात्मिक
आंतरराष्ट्रीय
आरोग्य
क्राईम
ताज्या बातम्या
भारत
मनोरंजन
महाराष्ट्र
राजकीय
विज्ञान/तंत्रज्ञान
व्यापार
शैक्षणिक
क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नावाने शेतकऱ्याला 67 हजारात फसवले
- by Team Lokjagar
- October 5, 2022
- 0 Comments
- 292 Views