November 21, 2024
गोदावरी नदीपात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम , जंतुनाशक फवारणी करून ४०० किलो कचरा संकलित
महाराष्ट्र

गोदावरी नदीपात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम , जंतुनाशक फवारणी करून ४०० किलो कचरा संकलित

महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आज दि. ५ मे रोजी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या उपस्थितीत पंचवटीमधील कन्नमवार पुल ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत गोदावरी नदी पात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहीमेत ४०० किलो प्लास्टिक आणि तत्सम कचरा गोळा करून घंटागाडीमार्फत उचलुन घेण्यात आला. तसेच मलेरिया विभागामार्फत नदी पात्रातील पाणवेलीही काढण्यात येउन नदी परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. स्वामी नारायण मंदिर समोर व्यवसाय करणाऱ्यांना आणि पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत देण्याबाबत व प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापराबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
सदर विशेष स्वच्छता मोहिमेत स्वच्छता निरीक्षक उदय वसावे,दीपक चव्हाण, मुकादम नंदू गवळी, किशोर साळवे, अनिल नेटावटे, वॉटरग्रेस प्रोड्क्टसचे विलास नाईकवाडे, कृष्णा शिंदे आणि ४५ स्वच्छता कर्मचारी तसेच मलेरिया विभागाचे कैलास पांगारकर आणि इतर कर्मचारी यांनी मोहीमेत सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version