November 21, 2024
महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारला जनतेचे देणं घेणं नाही – नाना पटोले
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारला जनतेचे देणं घेणं नाही – नाना पटोले

नागपूर : सरकारनं मध्यस्थी करावी.बगल बच्यासाठी त्या ठिकाणी प्रकल्पाचा आग्रह करू नये. खरंतर महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारला जनतेचे देणं घेणं नसल्यासारखे काम सुरू आहे. मी स्वतः बारसुला जाऊन आलो आहे, हा प्रकल्प कुठे झाला पाहिजे यासाठी सर्व बाबी तपासल्या पाहिजे, प्रकल्पा जवळच्या जागा सत्ता पक्षातील लोकांनी घेतल्यानं त्या ठिकाणी प्रकल्प होत असल्याचा प्रश्न आहे एका पत्रकाराची हत्या झाली आहे, ती गाडी कोणाची होती सर्वांना माहीत आहे. गुंडगिरी करून राज्यातील सरकार काय करत आहे असा प्रश्न आहे. हे सरकार बिल्डरांचे उद्योगपतीचे सरकार आहे. सामान्य जनतेचे सरकारला देणं घेणं नाही असं दिसून येत आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version