ANC – पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली होती. हिरामण बन्सी बर्डे आणि कचरू विठ्ठल वाघ यांच्या घराची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. अक्षरश: या दोन्ही कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली होती. काल दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाची पाहणी करून या दोन्ही कुटुंबांची भेट घेतली. त्यांची परिस्थिती पाहून त्वरित घरे बांधून देण्याचे आदेश दिले होते. तर काल सायंकाळपासूनच प्रशासनाकडून दखल घेत पडझड झालेल्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पत्र्याचे शेड बांधून तयार आहेत तर दारात वाळू येऊन पडली, आज विटा येणार असून पक्क्या बांधकामाला सुरवात होणार आहे. तर, मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबांना दिलासा मिळाल्याने या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र
AHMEDNAGAR | मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे आदिवासी कुटुंबाच्या घरांचे काम त्वरित सुरू, कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण
- by Team Lokjagar
- April 12, 2023
- 0 Comments
- 156 Views