नाशिक : मुंबई विद्यापीठ, न्यायालय, ईडी, सीबीआय यांच्यावर किती विश्वास ठेवायचा अशी आज परिस्थिती . ही सगळी त्यांची दुकानदारी आहे. सगळ्या यंत्रणा एका राजकीय पक्षाच्या सत्तेच्या टाचेखाली काम करतात हे कालच्या सुरतच्या निकालावरून स्पष्ट झाले ईडी, सीबीआय आणि शैक्षणिक संस्था देखील कशा कोणाच्या दबावाखाली काम करतात हे देखील स्पष्ट झाले आहेत
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांसाठी वेगळा रस्ता निघाला तर बघू आपण कारण विधी मंडळात जाण्याचा रस्ता एकच आहे मात्र चर्चा आणि सगल्या अफवा यामध्ये तथ् नाही असे राऊत म्हणाले.
शिवसेनेला स्क्रिपटेड भाषण करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वातंत्र्य बुद्धीने विचाराने काम करतो, आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा असून दुसऱ्यांची डोके आम्हाला कामाला लागत नाही असा टोला त्यांनी मनसेला लगावला. आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहे त्यांच्या चूक शोधून काढतात, आणि नसलेल्या चुकाना मोठे स्वरूप देतात कारवाया करतात, दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो असे राऊत म्हणाले.
गिरणा भ्रष्टाचार प्रकरणी बोलताना दादा भुसेनि आधी निवृती घ्यावी आणि मग चौकशीला सामोरे जावे कारण 175 कोटी रुपये दादा भुसे यांनी गोळा केले आहेत. अशा आवेशाने बोलणे ठीक आहे, पण त्यांचे पाय खाली थरथरत होते, दाढीला घाम फुटला होता गिरणाचा भ्रष्टाचार 175 कोटी त्यांना पचू देणार नाही असे राऊत म्हणाले.