गोंदिया : तब्बल चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाली असून त्यानंतर राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडाला असताना गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे प्रथमच खासदार सुनिल मेंढे यांच्या पुढाकारातून खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत प्रथमच भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 जिल्ह्यासह इतर चार राज्यातून शांभरावर बैलगाडा दाखल झाले होते. तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी लाखांहून नागरीक त्या ठिकाणी उपस्थित होते.