मुंबई : बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले आणि संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे विचार विकले असा टोला नरेश मस्के यांनी लगावला आहे. शिवसेना पक्ष तुम्ही राष्ट्रवादीला विकला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोराच्या तावडीतून बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि शिवसेना सोडून घेतलेली आहे. चोराच्या उलट्या बोंबा ही जी म्हण आहे ना हे तुमचे कडे बघितले तर हे सत्य आणि जाणीव होते असे नरेश मस्के म्हणाले.