नाशिक : वार्ताहर
पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्या कडुन 15 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर यास लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
सहाय्यक निबंधक एकनाथ प्रताप पाटील (, वय-57 वर्ष, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर. रा. नाशिक रोड) यांनी तक्रारदार हे साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पाथरे बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे वसुली विभागात काम करतात. पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे एका नोटीस चे 1500 रुपये असे 17 नोटीस चे एकूण 25 हजार ,500/-रु प्रमाणे लाचेची मागणी केली होती. गुरुवारी (दि . 15) 15 हजार ,500/- रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या कडून स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अप्पर अधिक्षक नारायण न्याहळदे, उपअधिक्षक.नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधिक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक
संदीप साळुंखे , फौजदार सुखदेव मुरकुटे, हवालदार पंकज पळशीकर , हवालदार मनोज पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
क्राईम
ताज्या बातम्या
साडे पंधरा हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक निंबधक ताब्यात
- by Team Lokjagar
- March 2, 2023
- 0 Comments
- 272 Views