विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, लोकांची गर्जना काय आहे काल आपण धाराशिवला पाहिले. ज्या पद्धतीने बच्चू कडू यांना जाब विचारण्यात आला तो जाब म्हणजे शिवगर्जना. ही गर्जना पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात जात आहोत.
कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभे संदर्भात चर्चा करू.
आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट सोमय्या ने लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याची चौकशी सुरू असताना सरकार बदललं आणि चौकशी थांबली. पण मी स्वता विक्रातचे पैसे कुठे गेले, विचारणार आहोत, मी स्वता न्यायालयात जाणार आहे
किरीट सोमय्या यांनी कोणतेही आरोप करण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला हे आधी सांगावं आणि मग बोलावं.
सरकार बदलताच अनेक चोरांना क्लीन चीट देण्यात आली. पण दुसरीकडे जो जाब विचारतो, त्याला तुरुंगात टाकायचं खोटे गुन्हे दाखल करायचे बदनाम करायचं अस षडयंत्र रचला जात आहे , पण जनता 2024 ला याचा सर्व हिशोब करेल
कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधा उत्तम रित्या चालवले गेले, त्या संदर्भात इकबालसिंह चहल यांनी स्वतः सांगितल.
कोव्हिडं संदर्भात गुन्हा दाखल करायचे असेल तर योगी आदित्यनाथ याच्यावर पहिल्यादा गुन्हा दाखल करावा. अनेक प्रेत गंगेतून वाहून गेली, सगळ्यात पहिला 307 चा गुन्हा सरकारने ययोगी आदित्यनाथ वरती टाकायला पाहिजे.
इतकच न्हवे तर कोव्हिड काळात गुजरात मध्ये स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या , त्यामुळे आरोप करणाऱ्यानी सर्वात प्रथम त्या ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करावा.
महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय आहेत, ज्यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे, त्यांना महाराष्ट्र लुटून दुसरा राज्यात न्यायचा आहे..
कसबा निवडणुक आपण हरतो आहोत हे जेव्हा भाजपला कळल तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. हाताशी यंत्रणेचा वापर करून तुम्ही राज्य करणार असाल तर हे राज्य कोलमडून पडेल.
चिंचवडची जागा जात आहे हे तुम्हाला कळालेली चुकीची माहिती आहे, कारण चिंचवडची जागा आमच्याकडे नव्हती, कसब्याची जागा भाजपकडून जातीय ही खरी बातमी आहे जी 30-35 वर्षे भाजपकडे आहे.
चिंचवड ची जागा कोण जिंकेल हे भाजपला सांगता येत नाही हा भाजपचा पराभव
विधिमंडळ मध्ये बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचा मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे यांनी दिली ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो
पद गेली तर पद परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे
पालघर मधील साधूंचा मृत्यू आणि कनेरी मठावरील गाईंचा मृत्यू आम्ही समान मानतो. कनेरी मठावरील गायीच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. आमचे आमदार आज विधिमंडळात गाईंना श्रद्धांजली वाहतील.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
राजकीय
विधिमंडळात बनावट शिवसेना आहे त्यामुळे विधिमंडळ हे चोर मंडळ आहे – संजय राऊत
- by Team Lokjagar
- March 1, 2023
- 0 Comments
- 270 Views