ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, प्रा यशवंत पाटील, कवी रवींद्र मालुंजकर, लेखक किरण सोनार,शुभांगी पाटील, राजेंद्र उगले आदींचा समावेश असलेल्या पुरस्कार वितरण उद्या शनिवारी दि 25 फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. या निमित्याने निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार असल्याची माहिती ज्ञानसिंधू प्रकाशनाचे अध्यक्ष तानाजी खोडे यांनी दिली आहे.
अशोकस्तंभ येथील राणी भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश जातेगावकर, पुष्कराज गावंडे, शंकर बोऱ्हाडे, डॉ भास्कर ढोके आणि वेदश्री थिगळे असणार असून यावेळी ज्ञानसिंधू साहित्य भूषण पुरस्कार प्रा. यशवंत पाटील, विजयकुमार मिठे यांना ज्ञानसिंधू साहित्य गौरव पुरस्कार किरण सोनार, राजेंद्र उगले, नंदकिशोर थोंबरे, डी टी पाटील धुळे, संदीप राक्षे, पुणे यांना ज्ञानसिंधू जिजाऊ पुरस्कार शंकुतला मांकड, शुभांगी माळी, सुमनताई अरगडे, छाया सोनावणे, कल्पना ठाकरे यांना ज्ञानसिंधू साहित्यसेवा पुरस्कार रवींद्र मालुंजकर, साहेबराव नंदन, संजय गोरडे यांना कलाभूषण पुरस्कार बाळासाहेब भगत, पुणे, ज्ञानसिंधू अध्यात्म भूषण पुरस्कार रमेश नंदन महाराज, समाजसेवा ललित साळवे तर ज्ञानसिंधू कै अभिमान पाटील पुरस्कार सुनीता चव्हाण यांना देण्यात येणार आहे.
या निमित्याने कवी संमलेन आयोजित केले जाणार असून कवी अमोल चिने पाटील सुत्रसंचलन करणार असून कवी सुभाष उमरकर, बाळासाहेब गिरी,
गोरख पालवे, सुवर्णा बच्छाव, रविकांत शार्दूल, रवींद्र दळवी, माणिकराव गोडसे, अलका कुलकर्णी, अजय बिरारी, आरती डिंगोरे, विशाल टर्ले आदी नाशिकचे कवी सहभागी होणार असून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञांनसिंधूचे अध्यक्ष तानाजी खोडे यांनी केले आहे