November 21, 2024
लासलगाव येथे रेल्वे टॉवर दुरुस्ती इंजिनची धडक : ४ कर्मचारी ठार
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

लासलगाव येथे रेल्वे टॉवर दुरुस्ती इंजिनची धडक : ४ कर्मचारी ठार

लासलगाव: रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली.लासलगावला लाईट दुरुस्त करणाऱ्या टावर इंजिनने धडक दिल्याने 4 मजुरांचा मृत्यूरुळावर काम करत असलेल्या 4 कर्मचाऱ्यांना रेल्वेने चिरडले:लासलगाव स्थानकाजवळ हि भीषण दुर्घटना घडली .नागरिकांकडून चालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अपघात झाल्यानंतर संतापलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चारही कर्मचारी जागेवरच ठार झाले. कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले, तर इतर कामगारांनी रेल्वे टॉवर गाडीच्या चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

काय घडले नेमके? रेल्वे लाईनची काम करणारी दोन डब्यांची रेल्वे टॉवर ही लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सहा वाजता उभी होती. या टॉवर गाडीला लासलगावहून पुन्हा उगावच्या दिशेने काम करण्यासाठी जायचे होते. रेल्वे पोल नंबर 230 /231 च्या दरम्यान या गाडीला काम करायचे होते. या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकमेन कामासाठी हजर होते. त्यांचे काम सुरू होते. मात्र, टॉवर गाडी ही डाऊनलाईननेच उगाव दिशेकडे गेल्याने या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आत गाडीने त्यांना चिरडले. त्यामुळे चौघे कर्मचारी जागीच मृत्युमुखी पडले.
मृतांची नावे:
संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी ट्रॅक मेंटनर या पदावर काम करत होते.

अपघात झाल्यानंतर संतापलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली. घटनेत चारही कर्मचारी जागेवरच ठार झाले. कर्मचाऱ्यांना रेल्वेने उडवल्याने संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या चालकावर लासलगाव रेल्वे स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लासलगाव पोलिसांनी रेल्वे चालकाला सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version