November 21, 2024
KALYAN | डोंबिवली मधील दिव्यांग तरुणीची झाली ऑलिंपिक मध्ये निवड
आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र

KALYAN | डोंबिवली मधील दिव्यांग तरुणीची झाली ऑलिंपिक मध्ये निवड

KALYAN – जन्मजात दिव्यांग असलेल्या सेजलने चारवर्षांपूर्वी शाळेच्या मैदानात फ़ुटबाॅलला मारलेल्या किकमुळे आज थेट तिची जर्मनीतील ऑलिंपिक मध्ये होणाऱ्या फ़ुटबाॅल स्पर्धेत निवड केली. त्यामुळे शारीरिक व्यंगापेक्षा साहस आणि ध्येय मोठे असते, हे दाखवून देणारी १८ वर्षीय सेजल म्हणजे दिव्यांगांमध्ये ऊर्जेचा स्रोतच असल्याचे दिसून आले आहे. दिव्यात राहणारी सेजल जयस्वाल ही दिव्यातीलच एका शाळेत शिकत होती. मात्र त्या शाळेच्या शिक्षकांच्या सेजल ही बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी डोंबिवलीतील क्षितिज शाळेत तिला घाला, तिथे तिची प्रगती होईल असे पालकांना सांगितले. त्यानंतर तिच्या आई वडिलांनी २०१९ साली क्षितिज गतिमंद शाळेत तिचे नाव घातले.

त्यानंतर तिची बौद्धिक क्षमता पाहून क्षितिज शाळेने तीला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. सातत्याने तिच्याकडून धावणे, उंच उडी, फुटबॉल या खेळांचा सराव करुन घेतला. इतकेच नव्हे तर विशेष मुलांच्या ऑलिंपिकसाठी तिचा अर्ज भरला. त्यानंतर विविध स्तरावर स्पर्धा खेळत सेजलने यश संपादन केले. ऑलिंपिकसाठी तिची सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली. नंतर ठाणे, पुणे, कोल्हापूर , गुजरात, झारखंड अशा विविध ठिकाणी जाऊन ती सपर्धेत सहभागी झाली. या सापर्धेत आपले कौशल्य दाखवल्यानंतर तिची ऑलिंपिकसाठी निवड करण्यात आल्याची माहिती तिच्या शिक्षकांनी दिली.

महाराष्ट्रातून दोन मुलींची यासाठी निवड करण्यात आली असून एक मुलगी नागपूरची असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जर्मनी येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी ती सराव करत आहे. दरम्यान तिचे वडील दिव्यात रिक्षा चालक असून आई गृहिणी आहे. सेजल बौधिकदृष्ट्या अभ्यासात मागे आहे. मात्र, ती उत्तम खेळाडू आहे. याचा मला अभिमान आहे. असे तिची आई सांगते. तिचे खाणे सांभाळणे आणि प्रकृतीकडे लक्ष देणे माझे कर्तव्य आहे. ते आम्ही करत असून आपली मुलगी काहीतरी करते आहे. याचा खूप आनंद झाल्याचे आईने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version