November 21, 2024
बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेते पदावरुन राजिनामा
ताज्या बातम्या भारत महाराष्ट्र राजकीय

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेते पदावरुन राजिनामा

संगमनेर-
माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.तरी याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आज थोरात यांचा वाढदिवस आहे.

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी तातडीने दखल घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील हे तात्काळ मुंबईकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.एच.के. पाटील हे मुंबईत बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असून त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचामधील वाद विकोपाला गेला आहे. आता हा वाद थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्लीला पाठवला आहे. अजून हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे, अशा आशयाचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे  पाठवलं आहे. त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस बाहेर आली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे. पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील थोरात यांनी पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version