November 21, 2024
AMRAVATI | घरकुल योजनेसाठी प्रहारचा मनपा आयुक्तालयावर मोर्चा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

AMRAVATI | घरकुल योजनेसाठी प्रहारचा मनपा आयुक्तालयावर मोर्चा

Amravati- अमरावती शहरात अनेक गरीब गरजू लाभार्थी आहे. ज्यांना हक्काचे घर नाहीत. त्यामध्ये रमाई आवास योजनेतील दारिद्र प्रमाणपत्राची अट आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील पीआर कार्ड ची अट रद्द करण्यात यावी, या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात शेकडो महिलांसमवेत मोर्चा काढण्यात आला. मनपा आयुक्तांना घरकुल प्रतिकृती भेट दिली. यावेळी आंदोलकांकडून तीव्र नारेबाजी करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्तांचे कार्यालय हे चवथ्या मजल्यावर असल्यामुळे मोर्चातील सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवाना त्रास सहन करावा लागला. तत्पूर्वी मनपा हद्दीतील विधवा, दिव्यांग , निराधार, वयोवृद्ध, बेघर नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने रेटून धरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version