अहमदनगर : अकोले तालुक्यात ग्रामीण भागात दारूची खुलेआम विक्री होत असल्यामुळे सर्वसामान्य परिवारांचे कुटुंब उध्वस्त होत चालल्याचे अनेक जणांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अखेर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी महिलांबरोबर दारूच्या दुकानावर मोर्चा काढत दारूबंदी विषयी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर ग्रामीण भागातील महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाने दारूविषयी योग्य ती भूमिका घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी पद्मश्री राहीबाई यांनी केली आहे.
BYTE – बीजमाता राहीबाई पोपेरे (पद्मश्री पुरस्काराने सन्मानित)