November 21, 2024
AHMEDNAGAR NEWS | संगमनेरमध्ये रस्त्यासाठी नागरीकांचे उपोषण
राजकीय

AHMEDNAGAR NEWS | संगमनेरमध्ये रस्त्यासाठी नागरीकांचे उपोषण

अहमदनगर – संगणमेर तालुक्यातील बिरवाडी येथील रस्त्यासाठी शिवप्रतिष्ठांचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राहुल बाजीराव ढेंबरे हे आमरण उपोषणाला बसले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांच्या ढिसाळ कारभार व रस्त्याच्या बाबतीत चालढकलपणा याला वैतागून अखेर सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहे.अनेक वर्षांपासून रस्त्याबाबत पत्रव्यवहार माहितीच्या अधिकारातून देऊन सुद्धा आमच्या पत्रांना केराची टोपली दाखवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल ढेंबरे यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करतोय रस्त्याच्या उद्घाटनने केले जाते रस्ता कागदपत्रे तयार केले जातात शिवाय रस्त्याचा निधी मंजूर केला जातो व प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेसाठी रस्ता दिसत नाही असा आरोप त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांच्यावर केला आहे. पठार भागातील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट अवस्था बघायला मिळत आहे. आमच्या पूर्वजन सुद्धा खड्ड्यातून प्रवास करत होते. आज आमची पिढी सुद्धा खड्डेमय रस्त्यातून प्रवास करीत आहे. मग शासन निश्चित कोणाचे आहे. असा घणघणीत आरोप त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांच्यावर केला आहे. रस्त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रणखांब फाटा ते वरवंडी, वरवंडी ते मांडवा खुर्द ,बिरेवाडी ते साकुर रस्त्याची अतिशय भयान अवस्था साकुर पठार भागामध्ये बघायला मिळत आहे.

निवडणुका येतात जातात व उद्घाटन पण होतात पण प्रत्यक्षात कुठलीही कृती बघायला मिळत नाही असेही त्यांनी सांगितले आहे. जोपर्यंत रस्ते मंजूर होत नाही व रस्त्याचे काम योग्यरीत्या होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही असे राहुल ढेंबरे यांनी सांगितले आहे. राहुल ढेंबरे यांच्या आमरण उपोषण रस्त्यासाठी साकुर पठार भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवलाने सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version