November 21, 2024
क्राईम राजकीय

NAGPUR | दोन टीम मध्ये झालेले वाद सोडवण्यासाठी गेलेल्या स्कोररला भाजप नेत्याच्या मुलाकडुन मारहाण

Nagpur : नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात सध्या खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने या महोत्सवाला गालबोट लागले आहे. मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात या आधी देखील अनेक वेळा यादव बंधूंनी गुंड गिरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत छत्रपती चौकात खामला एलेव्हण आणि स्टार इलेव्हण या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांची अर्जुन आणि करन यांचा समावेश होता. सामना सुरू असताना अर्जुने ने थ्रो बॉल वर पांचाशी वाद घातला. त्यांनी समजावून सांगितले असता आम्ही जे सांगतो तो निर्णय घ्या, यासाठी हैदोस घातला पंचाने नकार देताच स्कोरर ला मारहाण केली आणि समर्थकांनी मैदानात गोंधळ घातला. यामुळे सामना बंद करावा लागला. याची तक्रार सयोजक संदीप जोशी यांच्या कडे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version