November 21, 2024
माजी पोलीस अधीक्षकांसह मनसे  नेत्यावर गुन्हा दाखल   
क्राईम ताज्या बातम्या महाराष्ट्र

माजी पोलीस अधीक्षकांसह मनसे  नेत्यावर गुन्हा दाखल   

इगतपुरी रेशन प्रकरण भोवले 

नाशिक :  इगतपुरी तालुक्यात  गडगडसांगवी येथे  रेशन दुकानातील  धान्य विक्रीबाबत कारवाई करण्यात  झाली  होती. यामध्ये आरोपींना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली होती. मात्र  आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून   याप्रकरणी आता तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस कर्मचारी प्रभाकर खांदवे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पुरवठा निरीक्षक भरत भावसार, पुरवठा अधिकारी बी. आर. ढोणे आणि मनसे पदाधिकारी असलेले डॉ. प्रदीप पवार  या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार गोपाळ लहांगे यांनी जमिनीच्या वादाप्रसंगी मदत केली म्हणून संशयित आरोपींनी जातीवरुन शिवीगाळ करणे, मारहाण करणे, खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप केला आहे.

नाशिकच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा प्रकार घडला असून पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई न केल्याने संबंधित तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. खोटे गुन्हे दाखल करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version