माझ्यावर आरोप कोणी केलेत एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने माजी खासदाराने केलेत प्रत्येक आरोपाला उत्तर दिलीच पाहिजेत याची गरज नाही
ज्यावेळी पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं त्याचवेळी पोलिसांना सांगितलं पुढचे तीन दिवस मी व्यस्त असेल त्यामुळे येऊ शकत नाही पण त्यावेळी चुकीची बातमी चालवली गेली की किशोरी पेडणेकर चौकशीला सहकार्य करत नाहीत. आपल्याकडे खर नाही त्याला डर कशाला ही जी म्हण आहे ती मी कायम ठेवले. ठरल्याप्रमाणे मी चौकशीला आले. अडीच तास चौकशी झाली. तुमच्या घड्याळ प्रमाणे अडीच तास चौकशी झाली हे खरं आहे. अडीच तास चौकशी झाली. मुळात एवढा वेळ ते चौकशी करत नव्हते. सुरुवातीला खूप वेळ तर आमच्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची मला जी उत्तर माहिती होती ती मी त्यांना दिलेली आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने सर्व प्रकरण रंगवले जाते त्यातील दहा टक्के सुद्धा खरं नाही.
व्हाट्सअप चॅट चा मुद्दा जेव्हा आला, अगदी सर्वच पक्षांचे नेते मी मीत महापौर या सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत. या सर्वांचेच व्हाट्सअप चॅट असतात पण यातील किती चॅट मी पाहिलेत किती जणांना मी रिप्लाय केलेत उत्तर दिलेत हे देखील तपासले गेले पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीने जे काही व्हाट्सअप चॅट दाखवले असतील ते समोरच्या व्यक्तीने केलेले मेसेज आहेत माझ्याकडून त्याला काही रिप्लाय दिलाय का?
या प्रकरणात साप म्हणून दोरी बडवायची हे झालेला आहे.
त्या व्यक्तीवर मी बोलणार नाही त्या माणसावरून उत्तर देणार नाही हे आता कायद्याची लढाई सुरू आहे मी कायद्यानेच त्यांना उत्तर देईल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली आहे. त्यांची जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी जाईल. मी त्यांना माझ निवेदन देणार आहे. एकनाथ शिंदे हे मूळ सैनिक आहेत. त्यामुळे माझा हक्क आहे त्यांना भेटण्याचा.
पुन्हा चौकशी
मी त्यांना जाते म्हणून सांगून आले नेहमी आपण पुन्हा भेटू असं म्हणून एखाद्या ठिकाणाहून बाहेर पडतो पण मी जाते असे सांगून बाहेर पडले.