राज्यातील शिंदे फडणवीस सरकार राज्यात खोटा विचार पसरवत असून सरकारने दिवाळीच्या शिधा वाटपात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत सरकारने राज्यातील तरुणांना रोजगार दिला नाही शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत असा आरोप करत लवकरच राज्यपालांना भेटून हे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी बुलढाणा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय उलथापालथी होतात का ? असा सवाल उपस्थित होतो.
लोकांच्या आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. राज्यातल्या प्रमुख नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे. त्याचा स्वागतच आम्ही करतो, कारण की आमच्या जीवित त्याला कुठे धोका नाही आहे राज्यात सगळं अलबेल आहे. असं सरकारला वाटत असेल त्यामुळे हे सगळं केलं असेल असे उपरोधिकपणे बोलून सरकार मायबापांनी जनतेचे आणि विरोधकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारचीच असते हे त्यांनी ध्यानात ठेवाव….असं त्यांनी सांगितले.
खासदार अनिल बोन्डे यांनी पटोलेंवर केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता….ते म्हणले कि, देशाचे प्रधानमंत्री मोदींमध्ये भाजप वाल्यांना साक्षात देव दिसतो. त्याच्यामुळे मनुष्य मनुष्याची टिंगल करण्याचा अधिकार भाजपला आहे. त्यांनी आमची टिंगल केली तर आम्हाला काही फरक पडत नाही. आता पण जे काही तुम्ही सांगितलं होतं की दोन कोटी युवकांना दरवर्षी आम्ही नोकऱ्या देऊ, काळा धन काढून आणू, आणि पंधरा लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू या आश्वासनाची आठवण त्यांना असली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे त्याबाबत त्यांच्या तोंडातून वाफा निघत नाही , आणि बोंडेचा चेहराच टिंगलच्या लायकीचा आहे.त्यामुळे त टिंगलच करतील असे वक्तव्य त्यांनी केलेत.