२४ ऑक्टोबर रोजी नटवर पारिक कम्पाउंट मध्ये म्हाडा कॅालनीत १५ वी बिल्डिंगच्या कोपऱ्यात ३ अल्पवयीन मुले काचेच्या बॉटल मध्ये फटाके उडवत होते. (मयत व्यक्ती )सुनील उर्फ शंकर चंद्रशेखर नायडु ( वय २१ ) याने त्यांना काचेच्या बॉटलमध्ये फटाके उडवु नका असे सांगितले. परंतु त्याचा राग लहान मुलांना आला. आणि त्यांच्यात शाब्दिक वादावादी सुरु झाली.शाब्दिक वाद सुरु असताना हाणामारी सुरु झाली. भांडणात अचानक लहान मुलांनी चाकु सुनील याच्या मानेत घुसवला. त्याच जखमी अवस्थेत सुनील उर्फ शंकर हा त्या मुलाच्या मागे धावला. पण तो मुलगा सापडला नाही.
सुनील याच्या नातेवाईकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान सुनील चा मृत्यु झाला. तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांवर गुन्हा क्रमांक १०५९ \२२, कलम ३०२, ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा ३७ एक- अ यानुसार गुन्हा दाखल असुन तपास सुरु आहे.